अत्याचार करणाऱ्या बापाचे नाव माझ्या नावापुढे नको; पीडित मुलीचा उद्वेग सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

अत्याचार करणाऱ्या बापाचे नाव माझ्या नावापुढे नको; पीडित मुलीचा उद्वेग

स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून न्यात्याला काळीमा फासण्याचे ची घटना पुलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात चार वर्षापूर्वी घडली होती.

सुरेंद्र रामटेके

सुरेंद्र रामटेके

वर्धा : स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार Rape करून न्यात्याला काळीमा फासण्याचे ची घटना पुलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात चार वर्षापूर्वी घडली होती. या प्रकरणात न्यायालीन साक्ष नोंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका असे आर्जव न्यायाधीशांना केली. तिच्या या विनंतीमुळे दुष्कृत्य करणाऱ्या बापा विषय किती घृणा आहे हे स्पष्ट झाले. या प्रकरणात अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश सूर्यवंशी यांनी निकाल देताना नाराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.


या प्रकरणावर निकाल देताना न्यायाधीश सूर्यवंशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 6 नुसार जन्मठेपेची तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला भविष्यात जगण्यासाठी तसेच शिक्षणाकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा अंतर्गत तसेच मनोधैर्य योजने अंतर्गत आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात ती पीडित मुलगी अठरा वर्षे पूर्ण करेल त्यामुळे बालसुधारगृहातून तिला सोडण्यात येईल जवळचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे तिला अनुदक्ष गृहामध्ये तिला पाठवण्याची सोय बालसुधारगृहात कडून करण्यात येत आहे तिथे तिला नर्सिंग या सारखे अनेक ट्रेनिंग दिले जाईल ,तिला तिथे वयाच्या 23 वर्षापर्यंत ठेवण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालू आहेत

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी पुलगाव पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावचा रहिवासी आहे. आरोपी हा पीडितेचा जन्मदाता बाप आहे तिच्या आईचा लहान असतानाच मृत्यू झाला त्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. आरोपी हा दारूच्या आहारी गेलेला होता तसेच आरोपीच्या त्रासामुळे पीडित ही एका बालगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान एक ऑगस्ट 2017 ला आरोपी ने 13 वर्षीय पीडितेला घरी घेऊन गेला होता.

त्याच दिवशी मध्यरात्री घरातील इतर सदस्य झोपून असताना कुणाला आवाज येऊ नये म्हणून निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला शिवाय घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती

आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली होती तब्बल पाच महिने सतत अत्याचार केल्यामुळे पीडितेचा सहनशीलतेचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलिस स्टेशन 8 किलो मीटर पायी गाठून तक्रार नोंदविली तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजने यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

आता ATMवर मिळणार रेशन? रेशन दुकानात चकरा मारण्याचा त्रास वाचणार?

SCROLL FOR NEXT