Dombivli Politics Saam Digital
महाराष्ट्र

Dombivli Politics: हुकूमशाही नाही, ही विकासशाही; ठाकरे गटाच्या बॅनरबाजीला कोणी दिलं उत्तर?

Dombivli Politics News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने ‘तुमचे एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी’ असे मतदारांना आवाहन करणारे बॅनर डोंबिवली शहरात लावले आहेत.

Sandeep Gawade

Dombivli Politics

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने ‘तुमचे एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी’ असे मतदारांना आवाहन करणारे बॅनर डोंबिवली शहरात लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनरबाजीवर भाजप व शिवसेनेने त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. हुकूमशाही नाही ही विकासशाही आहे, असे म्हणत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाकरे गटाला उत्तर दिले आहे. ही माणसे आयुष्यभर हुकूमशाही मार्गाने चालली. त्यांना लोकशाही कळली नाही, असे म्हणत शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहे. विकासकामांचा धडाका, त्यासाठी निधीची तरतूद, कामांचे लोकार्पण, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार राजकीय पक्षांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिंदे गट व अजित पवार गटाकडूनही आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच विधानसभेची गणिते पक्षांकडून आखली जात आहेत. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच, असा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राज्याच्या राजकारणात सक्रिय झाला आहे. त्यातही आतापर्यंत शांततेच्या भूमिकेत असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर उतरल्याचे दिसत आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पहिलाच दौरा राज्यात केला. तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात. यानंतर ठाकरे गटाकडून डोंबिवली शहरात बॅनरबाजी केली आहे. यातून मतदारांना त्यांनी आवाहन केले आहे. मतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरू नये... तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी’ अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौका-चौकांत लावले आहेत. ठाकरे गटाच्या या बॅनरबाजीवरून आता भाजप व शिवसेनेने त्यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे.

लोकांनी विकासासाठी मतदान केले आहे. देशाचा विकास होत आहे. इथे कोणतीही हुकूमशाही नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे आणि त्या संविधानानुसारच सर्व कायद्याची कामे केली जात आहेत. त्यामुळे हुकूमशाहीचा प्रश्नच येत नाही. ही हुकूमशाही नाही तर विकासशाही आहे.

- गणपत गायकवाड, आमदार, भाजप

जी माणसे आयुष्यभर हुकूमशाहीच्या मार्गाने चालली ते काय लोकांना सांगणार की हुकूमशाही उलथवण्यासाठी मतदान करा. यांना आयुष्यभर लोकशाही कळली नाही. ते सांगतात की लोकशाही पद्धतीने मतदान करा. भाजप व शिवसेना हे पक्ष लोकशाहीच्या मार्गानेच चालत आहेत. म्हणून त्यांनी हे आम्हाला सांगू नये.

- राजेश मोरे, शहरप्रमुख, डोंबिवली शिवसेना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT