Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

पोलीस ठाण्यात केलेले 'रील' पडले महागात

पोलीस ठाण्यात केलेले 'रील' पडले महागात

प्रदीप भणगे

डोंबिवली : हल्ली सोशल मीडियावर अनेक जण हातात शस्त्र घेऊन भाई गिरीचे व्हिडिओ (Viral Video) तयार करून ते व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचे काम करत असतात. मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी (Police) पोलीस स्टेशनमध्ये व्हीडिओ तयार केलेल्या डोंबिवलीमधील (Dombivli) 'रील' स्टारला महागात पडले आहे. (Breaking Marathi News)

ठाकुर्ली परिसरात राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याने आपल्या इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. (Whats App) व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, इंस्टाग्राम आणि रीलवर व्हीडिओ तो करत असतो. असाच एक व्हीडिओ त्याने 25 तारखेला मानपाडा पोलीस स्थानकात केला. त्याचा तो हातात बंदूक घेतलेला व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यामुळे सुरेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

कक्षात कोणीही नसल्याचा फायदा

याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपी एका गुन्ह्यातील आणि महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामधील फिर्यादी आहे. त्याच गुन्ह्यातील तपासात 19 लाख 96 हजारांची रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. ते देण्यासाठी २५ ऑक्टोंबरला चौधरी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या कक्षात कोणीही नसल्याने त्याचा फायदा घेत सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ तयार केला आणि तो इंस्टाग्रामवर व्हायरल केला.

खुर्चीवर बसून केला व्‍हीडीओ

व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून खुर्चीच्या मागे असलेल्या महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि स्वतःचा व्हिडिओ काढून तो प्रसारित केला. तर त्याच्या इतर व्हीडिओमध्ये हातात बंदूक घेऊन नाचताना तो दिसतो. त्याच्या गाडीवर पोलिसांचा लोगो देखील आहे. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून मर्सिडीज कार आणि त्या गाडीमध्ये असणारे हत्यार असे एकूण 65 लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर इतर पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC: मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरे यांची 25 मिनिटे चर्चा; बैठकीत काय- काय ठरलं?

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणातील सहावा डॉक्टर आरोपी अटक

Chhatrapati Shivaji Maharaj fort: समुद्रासमोर सिंधुदुर्ग किल्ला ताठ उभा राहण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणती युगत मांडली?

मालेगाव महापालिकेच्या महासभेत राडा; MIM आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी, एकमेकांच्या अंगावर आले धावून|VIDEO

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

SCROLL FOR NEXT