Dombivli MIDC Blast Saam Tv
महाराष्ट्र

Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा १७ वर पोहचला; ५ बेपत्ता कामगारांची ओळख पटली

Dombivli MIDC Blast Case Update 17 Death: डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणात मृतांचा आकडा वाढला आहे. या स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये २३ मे रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू तर ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढला आहे, तर या दुर्घटनेत १७ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

आता डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोटाला पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अकरावरून सतरावर पोहोचला आहे. २३ मार्च रोजी झालेल्या स्फोटात बारा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर नऊ कामगार बेपत्ता होते. बेपत्ता कामगारांपैकी पाच कामगारांची ओळख पटली आहे. आता मृ्त्यूचा आकडा १७ वर पोहोचला (Kalyan News) आहे.

स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या पाच कामगारांचा शोध लागला आहे. तर इतर बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. मनीष दास, मनोज चव्हाण, रवी राजभर, भारत जैस्वार आणि विशाल पौडवाल (Dombivli MIDC Blast) या पाच कामगारांचा ओळख पटली आहे. या स्फोटामध्ये ६५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटामुळे संपूर्ण कंपनी जळून कोळसा झाली होती. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

स्फोट झाल्यानंतर (Blast Case) अनेक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला होता. अनेक इमारतींच्या काचा देखील फुटल्या होत्या. डोंबिवलीतील एमआयडीसीत अमुदान कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामुळे घटनास्थळी इतर दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली होती. घटनेनंतर कंपनीचा मालक फरार झाला होता. या स्फोटानंतर कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात (Dombivli) आली होती. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT