Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : टार्गेट पूर्ण करून मागितले अधिकचे काम; मॅनेजरकडून महिलेसोबत धक्कादायक कृत्य, डोंबिवली एमआयडीसीतील घटना

Dombivali News : डोंबिवली एमआयडीसीतील एम्ब्रोडरीज कंपनीत काम करणाऱ्या ज्योती खैर या महिलेने दिलेले काम वेळेत पूर्ण केले. यानंतर सदर महिलेला अधिक काम द्यावे अशी मागणी कंपनीच्या मॅनेजरकडे केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत काम करणाऱ्या महिलेला मॅनेजर कडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील एम्ब्रोडरीज कंपनीत अधिक काम मागितल्याने कंपनी मॅनेजरने महिला कामगारासोबत उद्धट वर्तन करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मॅनेजरसह मुकादमाला ताब्यात घेतले आहे. 

डोंबिवली एमआयडीसीतील एम्ब्रोडरीज कंपनीत काम करणाऱ्या ज्योती खैर या महिलेने दिलेले काम वेळेत पूर्ण केले. यानंतर सदर महिलेला अधिक काम द्यावे; अशी मागणी एम्ब्रोडरीज कंपनीच्या मॅनेजरकडे ५ मार्चला सायंकाळी महिलेने केली. या वेळी कंपनीचा मॅनेजर रणजित आगवले महिलेशी उद्धटपणे बोलू लागला. मात्र मॅनेजरला महिलेने प्रतिउत्तर दिल्याने संतपलेल्या मॅनेजरने महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत महिला जखमी 

यावेळी त्या ठिकाणी उपस्थित इतर महिला कामगार आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद थांबवला. मात्र या मारहाणीत ज्योती खैर या जखमी झाल्या असून सध्या या महिलेवर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी कंपनी मॅनेजरला जाब विचारत संबंधित मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

मॅनेजरसह एकजण ताब्यात 

सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. यानंतर महिलेला मारहाण करणारा मॅनेजर रणजित आगवले याच्यासह त्याचा साथीदार असलेला मुकादम विजय सेंडल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT