Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : खुनाच्या गुन्ह्यातुन सुटताच सुरु केली चेन स्नेचिंग; डोंबिवली मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात

Dombivali News : प्रभातने चैन स्नेचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती. त्यानंतर प्रभातने कल्याण, डोंबिवली, विरार भागात चैन स्नेचिंगचा धडाका लावला होता

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन तोडून फरार झाल्याचा घटना मागील काही दिवसांपासून कल्याण, (Dombivali) डोंबिवली परिसरात घडत होत्या. भर रस्त्यात महिलांची चैन तोडून फरार होणाऱ्या सराईत चैन स्नेचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. 

प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो टिटवाळा गणेश वाडी परिसरात वास्तव्यास आहे. प्रभातने चैन स्नेचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती. (Crime News) त्यानंतर प्रभातने कल्याण, डोंबिवली, विरार भागात चैन स्नेचिंगचा धडाका लावला होता. या वाढलेल्या घटनांबाबत (Manpada Police) पोलिसात तक्रार दाखल होत्या. त्यावरून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. 

दरम्यान डोंबिवलीमध्ये झालेल्या चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख आरोपीची पटविली. यानंतर सापळा रचून प्रभातला बेड्या ठोकल्या आहे. सराईत गुन्हेगार असलेला प्रभात दोन वर्षांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर तो चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यांकडे वळला असल्याची माहिती समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT