Dombivali Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

Dombivali News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. बहुतांश मतदारसंघातील निकाल देत विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरु असताना ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आहे. तसेच त्यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) निकाल हाती येत आहेत. बहुतांश मतदारसंघातील निकाल देत विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरु आहे. त्यानुसार डोंबिवली (Dombivali) विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरु असताना ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. 

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २१ पैकी १८ मशीनमध्ये ९९ टक्के बॅटरी, चार मशीनचा नंबर टॅली होत नाही. तसेच एक मशीन नॉन वर्किंग असून याबाबत अर्ज देऊन देखील दखल घेतली जात नाही; असा आरोप केला आहे. तसेच मतांबरोबर खेळ करण्यात आला असून लोकशाहीचा खून झाला आहे. सत्ताधारी पक्षांला जिंकवण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT