Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime: भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने कुऱ्हाडीने घेत माजविली दहशत; डोंबिवलीमधील धक्कादायक घटना

Dombivali News : दोन ते तीन दिवसांपूर्वी परिसरातील काही तरुणांनी मारहाण केली होती. हे समजल्यानंतर निलेश संतापला. संतापलेल्या निलेश रात्रीच्या वेळी कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: भावाला मारलं म्हणून संतापलेल्या भावाने चक्क हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर दहशत माजवली. इतकेच नव्हे (Dombivali) तर येणाऱ्या रिक्षा अडवून चालकाला मारहाण केली व कुऱ्हाडीने रिक्षाची व मोटारसायकलींची तोडफोड केली. दरम्यान हातात कुऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विष्णुनगर (Police) पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

डोंबिवली पश्चिम नेमाडे गल्ली परिसरात ही घटना घडली असून  निलेश शिनगारे असे आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली टेलकोसवाडी परिसरात राहणाऱ्या निलेश शीनगारे याच्या भावाला दोन ते तीन दिवसांपूर्वी (Crime News) परिसरातील काही तरुणांनी मारहाण केली होती. हे समजल्यानंतर निलेश संतापला. संतापलेल्या निलेश रात्रीच्या वेळी कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला. काल मध्यरात्री दोनच्या सुमारा डोंबिवली पश्चिमेतील जुने डोंबिवली परिसरात दहशत दाखवण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उतरला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्यरात्री कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर 

भररस्त्यात त्याने रिक्षा थांबवून रिक्षा चालकांना मारहाण केली. यात एक रिक्षा तसेच एका बाईकचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव निलेशला अटक केली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT