Solapur Breaking : दीड वर्षांत 5 हजार लोकांना चावले कुत्रे SaamTvNews
महाराष्ट्र

Solapur Breaking : दीड वर्षांत 5 हजार लोकांना चावले कुत्रे

सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात पाच हजारहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचं सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात पाच हजारहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचं सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मात्र, या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथक नसल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातून सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा :

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लोक शिळे अन्न रस्त्यावर टाकून देतात. चायनीज गाडे, हॉटेल चालक, मांस-मच्छी विक्रेते शिल्लक मांस रस्त्यावरच टाकून देतात. यातून भटकी कुत्री अधिक हिंस्र होत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी चार ते पाच जणांचे पथक नेमले होते. पुढचा-मागचा विचार न करता या कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले. पशुवैद्यकीय विभागाकडे सध्या केवळ एक कामगार असल्याचे सांगण्यात येते. हा एकटा माणूस शहरातील कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करणार, असा सवाल नगरसेवकांमधून उपस्थित होत आहे.B

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT