Dog Attack Video Saam TV
महाराष्ट्र

Dog Attack Video : कुत्रे मागे लागले, तो जीवाच्या आकांताने पळाला अन् कोसळला; भयंकर VIDEO

Ruchika Jadhav

भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजवर कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. आजही इचलकरंजीमध्ये अशीच एक घटना घडाली आहे. एका कॉलेजच्या विद्यार्थ्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने भयंकर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झालाय.

सदर घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण शांततेत रस्त्यावरुन पुढे येत आहे. तो चालत असताना कुत्र्यांची नजर त्याच्यावर पडते आणि सर्वजण त्याच्या मागे धावू लागतात. सुरवातीला एक कुत्रा प्रचंड वेगात मुलाच्या मागे धावत येतो. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ ५ ते ६ कुत्रे धावत येतात. कुत्र्यांना पाहून तरुण घाबरतो.

काय करावे आणि काय नाही त्याला काहीच सुचत नाही. सुरुवातीला तो सुद्धा धावू लागतो. तितक्यात शेजारी त्याला एक घर आणि बेसमेंट दिसतं. कुत्र्यांच्या तावडीत आपण सापडलो तर आपली काही सुटका नाही, असा प्रश्न त्याच्या मनात येतो आणि यातून वाचण्यासाठी तो थेट 10 फुटावरून खाली बेसमेंटमध्ये उडी घेतो.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अग्रेसर भवन परिसरातील ही घटना घडलीये. उंचावरून खाली पडल्याने या तरुणाला दुखापत झाली आहे. कॉलेजचा विद्यार्थी जेव्हा रस्त्यावरून जात होता तेव्हा संपूर्ण रस्ता मोकळा दिसत आहे. रस्त्यावर कोणीच नसल्याने या तरुणावर कुत्र्यांनी हल्ला केलाय. सदर घटनेनंतर आता या परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सोशल मीडियावर या आधी देखील कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एक महिला त्याच्या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये मॉर्नींगवॉकसाठी आली होती. त्यावेळी या महिलेवर सुद्धा कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला होता. महिला त्यावेळी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ओरडत होती, मात्र पहाटेची वेळ असल्याने कोणीही बाहेर नव्हते.

त्यावेळी महिलेने न घाबरता सर्व कुत्र्यांना आपल्यापासून दूर पळवून लावले असते. मात्र महिला घाबरली असती आणि पळू लागली असती तर सर्व कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला केला असता. त्या घटनेनंतर आता इचलकरंजीमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यावर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT