Neurologist Shirish Valasangkar 
महाराष्ट्र

Solapur: न्यूरोलॉजिस्ट डॉ. वळसंगकर मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचं नाव

Solapur Doctors Shocking Death: डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bhagyashree Kamble

सोलापूरमधील नामवंत न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरिष पद्माकर वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. या चिठ्ठीत त्यांनी मनीषा मुसळे- माने या महिलेचं नाव लिहिलं होतं. तसेच या महिलेमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुसाईड नोट सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने मनीषा मुसळे- माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

आरोपी मनीषा मुसळे-माने या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे मनीषा मुसळे- माने हिच्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केलं. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईला सुरूवात केली.

रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून, ही आत्महत्या आहे, की यामागे आणखी मोठी गोष्ट लपलेली आहे? याचा छडा लावण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

सोलापुरात शोककळा आणि संताप

सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांचं मोठं नाव होतं. हे सोलापुरातील अत्यंत लोकप्रिय न्यूरोलॉजिस्ट असून, त्यांच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT