Solapur News : प्रेम प्रकरण, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी तसेच सोशल मीडियाचा अतिवापर आदी कारणांमुळे महिला आणि मुली घर साेडून जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कारण समाेर आले. राज्यातील साेलापूर (solapur) जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांत तब्बल 2 हजार 352 महिला (women) आणि मुली (girls) बेपत्ता झाल्याची नाेंद पाेलिसांत (police) दाखल आहे. त्यातील काहींचा अद्याप शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)
सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली आणि महिला, तरुणी बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे असेही चित्र आहे.
पाेलिसांच्या नाेंदीनूसार जानेवारी 2022 ते मार्च 2023 या 15 महिन्यांत सोलापूर शहरातील (solapur city) 107 अल्पवयीन मुली तर 487 तरुणी, महिला बेपत्ता झाल्या. दुसरीकडे ग्रामीणमधील 1250 मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्यातील तब्बल 546 मुली, महिला, तरुणी अजूनही सापडलेल्या नाहीत.
मुली, महिला आणि युवती बेपत्ता हाेण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकीच एक प्रमुख कारण म्हणजे प्रेम प्रकरण, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी तसेच सोशल मीडियाचा अतिवापर असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान कोरोनाच्या संकटानंतर विवाहातील मानपान, हुंडा पुरेसा दिला नाही म्हणून कौटुंबिक छळाच्या घटना देखील वाढल्याचे पाेलिसांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.