Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: 'हिंदूव्यतिरिक्त कुणासोबतही व्यवहार नको', भाजप आमदार नितेश राणेंच्या विधानानं वाद; अजित पवार बरसले

Maharashtra Politics: सातत्याने वादात राहणाऱ्या नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. मात्र यावेळी त्यांच्या विधानावरून थेट महायुतीतच वाद निर्माण झालाय. नितेश राणेंच्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतलाय. नेमंक यांनी विरोध केलाय, काय घडलंय आणि काय बोललेयत नितेश राणे जाणून घेऊ...

Saam Tv

स्नेहिल झणके, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजप आमदार नितेश राणे आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही. नितेश राणेंच्या अशाच एका विधानामुळे वाद निर्माण झालाय. हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंनी गणपती मंडळाच्या भेटीदरम्यान आपल्या भाषणात हिंदू सोडून कोणाशीच व्यवहार करु नका, अशी जाहीररित्या शपथ दिली.

एवढंच नव्हे तर मुस्लिमांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. हिरव्या सापांना दूध पाजू नका हे आपले कधीच होणार नाहीत असेही तारे त्यांनी तोडले. मात्र त्यांच्या या विधानावरून महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले की, ''माझ्या सहकार्यांनी एक शपथ घेतली पाहिजे. मी जो काही व्यवहार करेल, तो फक्त हिंदूंशीच करेल.'' ते म्हणाले, यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो फक्त हिंदूशीच, ही शपत घेऊनच सर्वांनी येथून निघायचं आहे.''

याच विधानामुळे राज्याच्या वातावरणासोबतच महायुतीतील वातावरणदेखिल तापणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी सत्ताधारी नेत्यांचे कान टोचतांना एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटलंय.

याआधी देखील भाजप आमदार नितेश राणेंनी मशिदीत घूसून मारण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा महायुतीतील मुस्लिम नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती परंतू आता भाजप मधील मुस्लिम नेते आणि भाजपसोबत युतीत असणारे अजित पवारगटाचे हसन मुश्रीफ, बाबा सिद्धीकी आणि शिंदे यांच्यासोबत असलेले अब्दुल सत्तार याविधानावर प्रतिक्रीया देतात की, पुन्हा मूग गिळून गप्प बसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

SCROLL FOR NEXT