Mauli Wari Video Dive Ghat dindi
महाराष्ट्र

Mauli Wari Video Dive Ghat: माऊलींचा वैभवशाली पालखी सोहळा! दिवे घाटातलं डोळे दीपवणारं विहंगम दृश्य

Wari Video Dive Ghat: देवभक्तीच्या स्वरांनी भक्तीमय झालेल्या वारकऱ्यांसह संतांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Pandharpur Wari News: वारी म्हटलं की, लाखो वारकऱ्यांचा संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या नामांचा जयजयकार, विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगात तल्लीन झालेले वारकरी असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत आहे. देवभक्तीच्या स्वरांनी भक्तीमय झालेल्या वारकऱ्यांसह संतांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने 11 जून रोजी प्रस्थान केलं. त्यानंतर आज ही पालखी दिवे घाटातून जात आहे. दिवे घाटातून पालखी जात असताना वारकऱ्यांचा उत्साह काही वेगळाच असतो. विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेले वारकरी अतिशय उत्साहाने हा घाट चढतात. या घटातील वारीचं दृश्य पाहाणं ही एक अविस्मरणीय पर्वणी असते. जे वारकरी या वारीत सहभागी झाले, त्यांना याची देही याची डोळा याचा अनुभव घेता येतो.

परंतु ज्यांना वारीत सहभागी होणं शक्य झालं नाही. त्यांनाही या वारीच्या दृष्याचा अनुभव घेता येणार. हा संपूर्ण वारी सोहळा कव्हर करणाऱ्या 'दिंडी'च्या टीमने दिवे घाटातील वारीचं विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या टीमने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेलं हे दृश्य पाहून तुम्हालाही या दिंडीत सहभागी झाल्याचा अनुभव नक्की येईल. (Latest Political News)

यंदा आषाढी एकदाशी 29 जून रोजी आहे. या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठू माऊलीच्या भेटीने लाखो वारकरी दिंडीत पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. आषाढी एकदाशीला चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT