edible oil, import duty, central government saam tv
महाराष्ट्र

Edible Oil Price : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ

आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे.

Satish Daud

Edible Oil Price In Diwali : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात ही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे (Edible Oil) दर १० रुपयांनी वाढले आहे.

दिवाळीमध्ये खाद्यतेलाची मागणी जास्त असते आणि त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात तेजी आल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मागणीच्या तुलनेमुळे खाद्यतेलाची आवक कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयातशुल्कात मोठी कपात केल्यानंतर घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचा दर ९४१ डॉलर प्रति टनावर गेला आहे. तर सोयाबीन तेलाचा दर तब्बल १३६४ डॉलर प्रति टनावर गेला आहे. पामतेल व सोयाबीन तेलाच्या दरातील हा फरक विक्रमी आहे. एकूणच देशात अचानक सर्वसामान्य वापरत असलेल्या सोयाबीन तेलाची मागणी वाढल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या दरवाढीचा परिणाम अन्य सर्व खाद्यतेलांवर होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जोपर्यंत सरकार सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील २ दशलक्ष टन कोटा मर्यादा हटवत नाही, तोपर्यंत या तेलाचा पुरवठा कमी राहील आणि त्यांच्या किमती चढ्याच राहतील. सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना प्रतिलिटर २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागतात. सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन डेगमची आयात मर्यादा रद्द करावी किंवा पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT