Diwali 2022 , Sindhudurg,
Diwali 2022 , Sindhudurg,  saam tv
महाराष्ट्र

Diwali 2022 : नरकासुराचे दहनानंतर काेकणवासीयांनी तुळशीवृदांवना समोर फाेडलं 'कारिट'

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Diwali 2022 : तळकोकणात घरोघरी दिवाळीचा (diwali) उत्साह पहायला मिळत आहे. तुळशीवृदांवना समोर डाव्या पायाच्या अंगठ्याने कडू कारीट फोडून दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ आहे. आज पहाटे नरकासुराचे (narkasur) दहन केल्यानंतर अनेकांच्या घरी परंपरा जाेपासात काेकणवासीयांनी (kokan news) दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ केला. (Sindhudurg Latest Marathi News)

सिंधुदुर्गात नरकचतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अनेक ठिकाणी हौसी मंडळातर्फे नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास नरकासुराचे (Narkasur) दहन करण्यात आले. कणकवली (kankavali), कुडाळ (kudal), मालवण (malvan), सावंतवाडी (sawantwadi) व इतर ठिकाणी नरकासुर दहनाचा कार्यक्रम पार पडला. (Maharashtra News)

तळकोकणात घरोघरी दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. तुळशीवृदांवना समोर डाव्या पायाच्या अंगठ्याने कडू कारीट फोडून दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ आहे. भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून तुळशीवृदांवना समोर कारीट फोडले जाते व गोविंदा गोविंदा अशी जोरात आरोळी देऊन श्रीकृष्णाचं आवाहन केल जातं. ही परंपरा आजही काेकणवासीयांनी जाेपासात दिवाळी साजरी केली.

यासाठी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून असुरी शक्तीचा नाश केला त्याचे प्रतिक म्हणून तुळशीवृदांवना समोर कडू कारीट फोडण्याची प्रथा आहे. तळकोकणात (kokan) हा दिवस ‘चावदीस’ म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ही परंपरा नाही. आपल्यातले दुर्गुण, दुर्विचार यासोबत नष्ट व्हावेत यासाठी दिवाळीच्या पहिल्या आंघोळी नंतर कडू कारीट फोडून त्याची चव चाखली जाते. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने तळकोकणात घरोघरी दिवाळी साजरी केली जात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT