भाजपला जबर धक्का! खडसेंसह माजी आमदार संतोष चौधरींचा अर्ज बाद Saam Tv
महाराष्ट्र

भाजपला जबर धक्का! खडसेंसह माजी आमदार संतोष चौधरींचा अर्ज बाद

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता jalgaon district bank election अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात अनेक अर्जांवर हरकती घेण्यात आल्यावर त्यांची छाननी करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे Eknath khadse यांची सून रक्षा खडसे Raksha Khadse यांना दणका बसला आहे. यामुळे जळगावात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.

हे देखील पहा-

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर विकास सोसायटी मधून बिनविऱोध निवडून येणार आहेत. अर्जामधील त्रुटीमुळे सुनबाई रक्षा खडसे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अर्जांवर सुनावणी सुरू होती. अद्याप यामध्ये किती अर्ज अवैध, वैध याची माहिती निवडणूक विभागातर्फे आजून देखील मिळू शकली नाही.

संचालकपदाच्या २१ जागांकरिता २७९ जणांनी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये ३ जागा बिनविरोध झाले असून १९ जागांकरिता २१ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. बुधवारी अर्ज छाननी होऊन किती उमेदवारी अर्ज वैध, अवैध ठरले असते. मात्र, अनेकांनी बहुतांश उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून प्रत्येकी एक- एकच अर्ज आल्यामुळे धरणगाव गटामधून संजय मुरलीधर पवार राष्ट्रवादी, पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील, एरंडोल मधून अमोल चिमणराव पाटील शिवसेना असे बिनविरोध झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT