नोएडातील PNB बँकेतील कोट्यवधी रुपये गायब झाल्याचं प्रकरण ताजं असताना जळगावात धक्कादायक प्रकार समोर आलाय. जळगावातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरदिवसा दरोडा टाकून कोट्यवधी रूपयांची कॅश आणि सोनं लुटण्यात आलं. दुपारच्या सुमारास दोन दुचाकीवर हेल्मेट आणि मास्क घालून आलेले चार दरोडेखोरे सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्का देत बँकेत घुसले. या दरोडेखोरांनी बँकेत घुसताच कॅशियर आणि मॅनेजरवर एअरगन रोखू कोट्यवधींचा ऐवज लंपास केला. बँकेच्या 16 लॉकरमधून सोन्याचे दागिने व कॅश 6 बॅगांमध्ये भरून चोरट्यांनी पलायन केलं. मात्र, ग्रामस्थ आणि पोलिस पाटलांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. या सशस्त्र दरोड्यावेळी नेमकं काय घडलं हे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्याच तोंडून ऐका...
SBI बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची मोडस ऑपरेंडी कशी होती, ते पाहूयात...
SBI लुटीचा मोडस ऑपरेंडी (SBI बँक आणि दरोडेखोर)
गावात चादरी विकण्याच्या बहाण्याने दरोडेखोरांकडून रेकी
दुपारी 4 वाजता 4 सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले
दरोडेखोरांनी पिस्तूल रोखत बँक मॅनेजर आणि कॅशियरला मारहाण करत दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवलं
इतर दरोडेखोरांनी पिस्तूल रोखल्यानं इतर कर्मचाऱ्यांना हालचाल करता आली नाही
दरोडेखोरांनी बँकेतील 16 लॉकर फोडले
त्यानंतर रोकड आणि सोने बॅगांमध्ये भरलं
लॉकरमधील अंदाजे 35 कोटींचं सोनं, चांदी, कॅश बॅगेत भरून दुचाकींवरून पळ काढला
मात्र, कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजताच ग्रामस्थांनी पाठलाग करून दरोडेखोरांना पकडलं
विशेष म्हणजे, पोलिसांनी तातडीने पोलिस पाटलांच्या मदतीने अनेक गावात नाकाबंदी करून चारही दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत मुद्देमालासह पकडलं. मात्र, या दरोड्याचा मास्टमाईंड हा बडतर्फ पोलीस अधिकाऱीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. बडतर्फ PSI शंकर रमेश जासकनं कारागृहात असतानाच दरोड्याचा कट केल्याचं उघड झालाय. एव्हंढच नव्हे तर 3 वर्षांपूर्वीच एका दरोड्याच्या गुन्ह्यात जासकवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उघडकीस आलीये.
देशभरातील बँकांचे विलीनीकरण, डिजिटल अरेस्ट आणि कोट्यवधींच्या ठेवी गायब होत असताना भरदिवसा दरोडा टाकून बँक लुटण्याचा प्रकार गंभीर आहे. सर्वसामान्य ग्राहक आयुष्यभराची कमाई बँकेत विश्वासानं ठेवत असतात. मात्र, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI बँकेतील ठेवींची सुरक्षा राम भरोसे असेल तर आता बँकेच्या शाखांच्या सुरक्षेसह सर्वसामान्य ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.