Disha Salian Death Case: saam tv
महाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. दिशाबाबत सीबीआयनं नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नेमकं काय नमूद केलंय? कोणाकोणाला आरोपी केलंय? पाहूयात हा रिपोर्ट.....

Suprim Maskar

दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडालीय... याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयनं दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबावरून एफआयआर दाखल केलाय...ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचा अंगरक्षक यांना मुख्य आरोपी करण्यात आलंय...तब्बल 6 वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा कोणाकोणावर गुन्हा दाखल झालाय...ऐका...

दिशा प्रकरणात

FIR मध्ये कुणाची नावं?

आदित्य ठाकरे, आमदार

आदित्य ठाकरेंचा बॉडीगार्ड

दिनो मोरिया, अभिनेता

सूरज पांचोली, अभिनेता

रिया चक्रवर्ती, अभिनेत्री

परमबीर सिंग,तत्कालीन पो.आयुक्त

सचिन वाझे, तत्कालीन पो.अधिकारी

यांना आरोपी करण्यात आलंय. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, संबंधित पोलीस स्टेशनचे बहुतांश अधिकारी आणि पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टर्सचाही दबाव आणण्यात आणि पुरावे नष्ट करण्यात सहभाग असल्याचं या FIRमध्ये नोंदवण्यात आलेल्या दिशाच्या वडिलांच्या जबाबात नमूद करण्यात आलंय. मात्र यावरून आता जोरदार राजकारण पेटलंय.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप करण्यात येत होते... मात्र आता गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरेंना या प्रकरणात थेट आरोपी करण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता सीबीआय तपास नेमका कोणत्या दिशेनं जातो आणि यावरून कसे राजकीय पडसाद उमटतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT