Shruti Vilas Kadam
आलू मटर मसाला बनवण्यासाठी ३ उकडलेले बटाटे, १ वाटी हिरवे मटार, २ बारीक चिरलेले कांदे, २ टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्या.
कढईमध्ये २ चमचे तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यानंतर कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
कांदा परतल्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घाला. नंतर टोमॅटोची पेस्ट टाकून चांगली शिजवा. त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घालून मसाला परतून घ्या.
तयार मसाल्यामध्ये उकडलेले बटाटे आणि हिरवे मटार घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा, जेणेकरून मसाला बटाट्याला आणि मटारला छान लागेल.
आता आवश्यकतेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ टाका आणि कढईवर झाकण ठेवून भाजी ८ ते १० मिनिटे शिजू द्या. मटार मऊ होईपर्यंत शिजवा.
भाजीला अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात थोडी कसुरी मेथी आणि चमचाभर फ्रेश क्रीम घाला. यामुळे भाजीला छान सुगंध आणि मलाईदार चव येईल.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सजवा. गरमागरम आलू मटर मसाला पोळी, चपाती, पराठा किंवा जीराभातासोबत सर्व्ह करा.