Shruti Vilas Kadam
एक ताजे बीटरूट घ्या. ते स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर कापडाने गाळून त्याचा रस काढा.
एका वाटीत २ चमचे बीटरूटचा रस घ्या. त्यात १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. दोन्ही व्यवस्थित मिसळून घ्या.
तयार मिश्रणात बदामाच्या तेलाचे २ ते ३ थेंब घाला. यामुळे ब्लश लावायला सोपा होतो आणि त्वचेला मऊपणा मिळतो.
तयार ब्लश एका स्वच्छ छोट्या डब्यात भरा. तो फ्रिजमध्ये ठेवा. घरगुती ब्लश लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे थोड्याच प्रमाणात तयार करा.
बोटांनी किंवा मेकअप ब्रशने थोडासा ब्लश गालांवर लावा. हलक्या हाताने पसरवा. यामुळे गालांना सुंदर गुलाबी रंग येईल.
बीटरूटच्या रसामुळे ओठांना हलका गुलाबी रंग मिळू शकतो. त्यामुळे नैसर्गिक लुकसाठी याचा वापर करता येतो. मात्र, जळजळ झाल्यास वापरणे थांबवा.
बीटरूट ब्लश लावल्यामुळे गालांवर नैसर्गिक गुलाबी रंग दिसतो. यामुळे चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसतो. वापरण्यापूर्वी हातावर थोडे मिश्रण लावून तपासा.