discovery of a new flowering plant of the cilantro family from the Jambha Plateau in the Konkan. saam tv
महाराष्ट्र

Kokan: रत्नागिरीत श्रीरंगीया कोंकनेन्सिस फुलवनस्पतीचा लागला शोध

संशाेधकांना भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे संशोधनासाठी सहकार्य मिळाले.

अमोल कलये

रत्नागिरी : नवीन फूल वनस्पतीच्या प्रजातीचा शोध लागणे असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल, परंतु नवीन फुल वनस्पतीच्या गणाचा/ वर्गाचा शोध लागणे अशी बातमी कधी तरीच ऐकायला मिळते. कोकणातून (kokan) बऱ्याच संशोधकांनी नवनवीन फुल वनस्पतींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून (maharashtra) काही फूल वनस्पतीच्या प्रजातींचे नवीन गण म्हणून स्थापना केलेली आहे. परंतु अलीकडच्या शंभर वर्षाच्या कालावधीत नवीन गणाचा शोध लागलेला नाही. आता अशा प्रजातींमध्ये नवीन फुल वनस्पतींच्या गणाचा समावेश झाला आहे. अशा वनस्पती प्रजाती दुर्मिळ असतात. (ratnagiri latest marathi news)

कोकणातील जांभ्या खडकाच्या पठारावर कातळ परिसरात नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. श्रीरंगीय गणातील आणि श्रीरंगीया कोंकनेन्सिस ही नवी वनस्पती आहे.ही नवी प्रजाती हीमालयातील चामाईसीअमशी साधर्म्य आहे. प्राध्यापक डाँ.अरुण चांदोरे आणि त्यांचे संशोधत  विद्यार्थी देवीदास बोरुड, प्राध्यापक कुमार विनोद गोस्वामी , आणि विद्यार्थी नीलेश माधव यांनी हा शोध लावलाय.

रत्नागिरी (rantagiri) जिल्ह्यातील राजापूर (rajapur) तालुक्यातील विखारे-गोठणे येथे असलेल्या आबासाहेब मराठे महाविद्यालय परिसरातून नवीन फुलवनस्पती गणाचा शोध लागला आहे. राजापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेतील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखडा आणि आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे (Arun Chandore) आणि त्त्यांचे संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे (Devidas Borude) आणि त्यांच्या बरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी. आर्ट्स अँड आर.वाय.के. सायन्स कॉलेज मधील वनस्पतिशास्त्रचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी (Kumar Vinod Gosavi) आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी निलेश माधव (Nilesh Madhav) यांनी चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे संशोधन केले आहे. नवीन गणाचे काही प्रमाणातील बाह्यरंग हिमालयातील चामाईसीअम (Chamaesium) ह्या गणाची साधर्म्य दाखवते. परंतु बऱ्याच बाह्यरंगाचे गुणधर्म हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या नवीन गणात एक प्रजातीचा समावेश केलेला आहे.

गणाचे नाव श्रीरंगिया (Shrirangia) हे जगद्विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. श्रीरंग यादव (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे आणि प्रजातीचे नाव श्रीरंगिया कोंकनेन्सिस (Shrirangia concanensis) असे आहे. श्रीरंगिया कोंकनेन्सिस हे नाव त्याच्या रहिवासीचे स्थान ‘कोकण’ या नावावरून देण्यात आलेले आहे. या नवीन वनस्पतीगणाचा शोधनिबंध जगविख्यात जर्नल नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी, स्वीडन येथून काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला. या संशोधन कार्यात एम.व्हि.पी. समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर, येथील वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद कांबळे आणि डॉ. कांची गांधी वरिष्ठ नामांकन रजिस्ट्रार,हार्वर्ड युनिव्हर्सिटी हर्बेरिया आणि लायब्ररी, केंब्रिज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे संशोधनासाठी सहकार्य मिळाले.

वनस्पतीचा आढळ: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कातळावरती झुडपाखाली सापडते.

फुले व फळे येण्याचा कालावधी: जून ते जुलै

नवीन गणाचे वैशिष्ट्ये

नवीन गणाचे बोटॅनिकल नाव: श्रीरंगिया (Shrirangia Gosavi, Madhav & Chandore)

नवीन प्रजातीचे बोटॅनिकल नाव: श्रीरंगिया कोंकनेन्सिस (Shrirangia concanensis Gosavi, Madhav & Chandore)

वनस्पतीची उंची साधारणत एक फुटापर्यंत असते.

नवीन प्रजाती ही कोथिंबीर कुळातील कंदवर्गीय आहे.

फुले पांढऱ्या रंगाची छोटी असतात.

फळे लंबगोलाकार लहान आहेत.

फळांमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी मानी दोन प्रकारच्या शिरा आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT