परभणीच्या लोअर दूधना धरणातून नदी पात्रात विसर्ग  saam tv
महाराष्ट्र

परभणीच्या लोअर दूधना धरणातून नदी पात्रात विसर्ग

लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणी : लोअर दुधना प्रकल्प (Lower dudhna Project) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री व बुधवारी (ता.१४) रोजी जोरदार पाऊस (Monsoon) झाला. जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने या धरणाच्या १४ दरवाज्यातून १४,२८० क्युसेसने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये अजून भर पडत आहे. त्यामुळे प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे धरणाचे द्वार क्र.०१ ते ०७ आणि १४ ते २० हे दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले असून, एकूण १०२०x१४ = १४,२८० क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विद्युत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

SCROLL FOR NEXT