Beed News saam tv
महाराष्ट्र

Beed News : हा फार्स कशासाठी, अजित पवारांना दिव्यांगांचा सवाल ? जिल्हा परिषद परिसरात छेडलं आंदाेलन

विशेष म्हणजे काही जणांनी याच बोगस प्रमाणपत्र आधारे नोकर भरतीचा लाभ घेतल्याचं आढळून आले आहे.

विनोद जिरे

Beed News : बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांचा बोगस दिव्यांग शोध मोहिमेचा फार्स कशासाठी ? असा सवाल आंदाेलकांनी उपस्थित केला.(Maharashtra News)

यावेळी आंदाेलकांनी मेंदू विकार शिक्षक पदस्थापनेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात दिव्यांगांचे वाहन चालवून आंदोलन केले.

बीड जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून पदोन्नती मिळविली आहे. विशेष म्हणजे काही जणांनी याच बोगस प्रमाणपत्र आधारे नोकर भरतीचा लाभ घेतल्याचं आढळून आले.

त्यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. जिल्हा परिषदेने कारवाईचा केवळ फार्स करू नये, असे देखील या आंदोलनातून मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजपच्या माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन्ही काका पुतणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, भाजपवर तोफ डागणार? VIDEO

konkan Tourism : गणपतीपुळे जवळील शांत अन् पांढऱ्या वाळूचा किनारा, 'हे' ठिकाण फारच कमी लोकांना माहितेय

Airoli Katai flyover: नवी मुंबईतून काही मिनिटांतच कल्याण-डोंबिवलीत पोहोचता येणार; ऐरोली-काटईदरम्यानचं सर्वात मोठं काम पूर्णत्वाला...

SCROLL FOR NEXT