Dipali Sayyad Saam Tv
महाराष्ट्र

Dipali Sayyad News: दिपाली सय्यद यांचे दाऊद गॅंगशी संबंध; माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेचा गंभीर आरोप

सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन बनसोडे

अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद भोसले यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्यासोबत आर्थिक संबंध असून त्या अनेक वेळा दुबईला जातात. त्यांची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. (Political News)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान केले. हा कार्यक्रम दिपाली सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यावेळी सर्व कोविड योध्यांना 50 हजार रुपयांचे चेक देण्यात आले होते.

मात्र हे चेक खोटे असून 50 लोकांना दिलेल्या चेक पैकी एकही चेक बँकेत जाऊन पैसे काढण्या लायक नसल्याने दिपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योध्यांची फसवणूक केली आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं.

तसेच सांगलीमध्ये कोविड काळात सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी नाव नोंदणी न झाल्याने लग्न झालेले आणि ज्यांना मुले आहेत, अशा दाम्पत्याची लग्न लावली गेली आहेत. या कार्यक्रमालाही राज्यपालांनी उपस्थिती लावली होती.

माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी. मी 30 जानेवारी रोजी नगरमध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्याबरोबर दिपाली सय्यद यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे देऊ, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT