Dilip Walse Patil Saam TV
महाराष्ट्र

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; दोन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

Dilip Walse Patil Health Update : डॉक्टरांच्या सल्ल्याने वळसेपाटलांच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी रात्री शरद पवारांनी वळसेपाटलांशी फोनवरुन संवाद साधला होता.

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

Pune :

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यावर दोन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दिलीप वळसे पाटील आपल्याच घरामध्ये पाय घसरून पडले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीटर अकाउंटवरून माहिती देखील दिली होती. "राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.", असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

त्यानंतर पुण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. घरात पाय घसरुन पडल्याने हात पाय आणि खुब्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांना यातून बरं होण्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्याने वळसेपाटीलांच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी रात्री शरद पवारांनी वळसेपाटलांशी फोनवरुन संवाद साधला होता. तसेच वळसेपाटलांवर शस्त्रक्रिया सुरू असताना सुप्रिया सुळे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT