डिझेल अभावी लालपरीच्या 50 टक्के फेऱ्या रद्द ... संजय जाधव
महाराष्ट्र

डिझेल अभावी लालपरीच्या 50 टक्के फेऱ्या रद्द ...

मागील आठवड्यापासून बुलढाणा जिल्ह्यात एसटीला डिझेल मिळेनासे झाल्याने महामंडलाने ५० टक्के बस फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : सर्वसामान्यांना कमी दरात वाहतूक Transportation करणारी लालपरीच्या ST Bus फेऱ्या बंद झाल्यामुळे प्रवाशामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लाल परीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी प्रवास करत उदरनिर्वाह करतात. परंतु, मागील आठवड्यापासून बुलढाणा Buldhana जिल्ह्यात एसटीला डिझेल Diesel मिळेनासे झाल्याने महामंडलाने ५० टक्के बस फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

यामुळे बसने प्रवास Travel करणाऱ्या प्रवाशांनी प्रचंड़ रोष व्यक्त केला आहे. जिल्ह्यात एकुन ११ आगार असून, एकाही आगारात डिझेल नसल्यामुळे असंख्य बस जागेवरच थांबले आहेत. एसटी शेवटची घटका मोजत असल्याचे यावेळी दिसून येत आहे. महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात income मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच सर्व बसेस भंगार अस्वथेत असून, तरीदेखील त्यामध्ये प्रवास केला जात आहे.

सरकार एकीकडे एसटी चे खच्चीकरण करून दुसरीकडे खाजगी बस सेवेला चालना देताना दिसत आहे. यामुळे एसटी काही दिवस टिकेल, असे चित्र दिसून येत आहे. सरकारने तातडीने एसटीला सुरळीत डिझेल मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी केली जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार असल्याचा आरोप आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी करत सरकारच्या government या धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे. तर त्वरित बंद करण्यात आलेल्या लालपरी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

Crime: विमान प्रवासात महिलेवर बलात्कार, भारतीय नागरिकाला अटक

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT