Manikrao Kokate Saam tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate : शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य; कृषीमंत्री कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; प्रतिमेला मारले जोडे

Dhule Yavatmal News : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून आले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक

साम टिव्ही ब्युरो

धुळे/ यवतमाळ : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. कोकाटे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असून धुळे व यवतमाळमध्ये कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात शिवसेना ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन तर यवतमाळमध्ये कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकवण्यात आला.  

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून आले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले असून या ठिकाणी झाशी राणी पुतळा परिसरामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारून शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. 

कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घ्या  

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा; अशी मागणी देखील ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यवतमाळात ठाकरे गटाचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
यवतमाळ
: शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर करित यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भर चौकात कृषी मंत्र्याचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं. मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT