Dhule Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Dhule Crime: घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, पाळीव कुत्र्यामुळे प्रकरण उघड

Dhule Crime News: चोरीची उकल करण्यासाठी पोलीस श्वानाची मदत घेतात. पंरतु, धुळ्यात झालेल्या चोरी आणि चोरट्यांचा छडा लावण्यासाठी त्यांच्याच पाळीव श्वानाची मदत पोलिसांना झालीय.

Bhagyashree Kamble

चोरीची उकल करण्यासाठी पोलीस श्वानाची मदत घेतात. पंरतु, धुळ्यात झालेल्या चोरी आणि चोरट्यांचा छडा लावण्यासाठी त्यांच्याच पाळीव श्वानाकडून पोलिसांना मदत झालीय. धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ डिसेंबर रोजी घरफोडीचा प्रकार घडला. घरमालक कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे त्यांनी संधी साधली. घरातील सोनं चांदी आणि पितळीच्या भांड्यांवर डल्ला मारला. चोरी करताना त्याच्यांसोबत श्वान देखील होता. श्वानामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभात नगर परिसरात चोरीची घटना घडली. घरमालक राम निकम काही कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधत दरवाजा तोडून सोनं चांदी आणि पितळ्याच्या भाड्यांवर डल्ला मारला. त्यांनी एकूण १ लाख २० हजारांच्या मुद्देमालावर हातसफाई केली. याप्रकरणी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी देवपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासाला गती देत शोधपथकाने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात दोन चोरट्यांसोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील होता.

परंतु चोरट्यांचे तोंड मफलरने झाकलेले होते. ज्यामुळे चोरट्याला ओळखणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. परंतु चोरट्यांसोबत पाळीव कुत्रा होता. त्याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. कुत्रा पाळणारा सराईत गुन्हेगार कोण? याचा तपास पोलीस रेकॉर्डवरून लावला असता, अट्टल गुन्हेगार हर्षल उर्फ सनी चौधरी असल्याची माहिती मिळाली. नंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

नंतर श्वान पथकातील जयला आरोपींनी घटनास्थळी हाताळलेल्या वस्तुंचा वास देण्यात आला. श्वानाने संशयित आरोपी हर्षल चौधरी याच्या घराजवळ नेले. यावेळी त्याच्या घराची तपासणी केली असता, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मफलर सापडले. हर्षलची सखोल विचारपूस केली असता, त्याने मित्र जयवंत बापु पाटीलसोबत चोरी केल्याचे कबूल केले. यानंतर जयवंत बापु पाटीलला देखील ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

SCROLL FOR NEXT