Songir Accident Saam tv
महाराष्ट्र

Songir Accident : मामाच्या मुलीचे लग्नासाठी आले असताना मृत्यूने गाठले; स्कूटी घसरून एकाचा मृत्यू, एकजण जखमी

Dhule News : नातेवाइकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतित देशमुख यांनी तपासणी करून मृत घोषित केले

साम टिव्ही ब्युरो

सोनगीर (धुळे) : मामाच्या मुलीचे लग्न असल्याने गावी आला होता. दोन दिवसांवर लग्न असल्याने आंब्याचे (Dhule) पाने आणण्यासाठी जुन्या मुंबई- आग्रा महामार्गावरील जामफळ प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गावर स्कूटी घसरून (Accident) एकाचा मृत्यू झाला. तर  एकजण जखमी झाल्याची घटना घडली. (Live Marathi News)

कपिल श्‍यामसुंदर कासार (वय ३९, रा. ठिकरी, मध्य प्रदेश ह.मु. श्री गुरुगोविंद समाधी रोड, सोनगीर) असे मृताचे नाव आहे. तर सोहन गोपाळ कासार (वय २४) हा जखमी झाला आहे. मृत कपिल कासार यांच्या मामाच्या मुलीचे १३ फेब्रुवारीला लग्न (Marriage) असल्याने तोरण व शुभकार्यासाठी येथून दीड किलोमीटर जामफळ प्रकल्प परिसरातील शेतात आंब्याची पाने घेण्यासाठी स्कूटीवर जात होता. या दरम्यान स्कुटी घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाइकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतित देशमुख यांनी तपासणी करून मृत घोषित केले. जखमी सोहनला उपचारासाठी धुळ्याला नेण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटुंबात दुःखाचा डोंगर  

मृत कपिलच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा (२ वर्षे), एक मुलगी (६ वर्षे) असा परिवार आहे. सर्व परिवाराचा चरितार्थ त्यांच्यावर अवलंबून असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नामुळे मामांकडे आनंदाचे वातावरण होते. या घटनेने सर्व नातेवाईक सुन्न झाले आहेत. मृत कासार पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळेल या अपेक्षेने २२ वर्षांपूर्वी कुमार वयातच येथे आले होते. भांडी बनविण्यात तरबेज झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT