Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: मातृदिनी आईच्या पोटचा गोळा हिरावला; विजेच्या धक्क्याने सौरभने गमावला जीव

मातृदिनीच आईची कोख सुनी; विजेच्या धक्क्याने सौरभने गमावला जीव

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील शिंगावे शिवारात विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी (Dhule News) घटना घडली आहे. प्लॉटचे चालू बांधकामावर पाणी मारतांना विजेच्या जोरदार झटका (Electric Shock) लागल्याने २६ वर्षीय सौरभ जयवंतराव बागुल याचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

शिंगावे शिवारात दौलतनगर मागे एका कॉलनीत सौरभ बागुल याचे स्वतःच्या प्लॉटचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर पाणी मारण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक मोटर सुरू करयला सौरभ गेला. यावेळी त्‍याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्‍का बसल्‍याने सौरभ दूरवर फेकला गेला. हे पाहून परिसरातील नागरीकांनी त्‍याला शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी सौरभला तपासणी करून मयत घोषित केले. सौरभच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार असून ऐन मातृदिनीच सौरभच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या आईची कोक सुनी झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑयली, ड्राय की कॉम्बिनेशन स्किन? तुमच्या त्वचेसाठी कोणता फेसवॉश आहे बेस्ट, जाणून घ्या

Power bank charging: पॉवर बँक 100 टक्के चार्ज करावी का?

बीडमधील सर्वात मोठी घरफोडी; ५३ तोळे सोनं, २ किलो चांदी अन् रोकड लुटणाऱ्यांना परळीतून अटक, तलावात उड्या मारून...

Warm Bath Benefits: रोज कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

Shocking: शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडली अन्..., मुख्याध्यापकाचा खरा चेहरा समोर; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT