Beed Bajar Samiti
Beed Bajar SamitiSaam tv

Bajar Samiti Election: ३५ वर्षांनंतर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महिलाराज; सरला मुळे पहिल्या महिला सभापती

३५ वर्षांनंतर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महिलाराज; सरला मुळे पहिल्या महिला सभापती
Published on

बीड : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ३५ वर्षानंतर सत्तांतर (Beed) झाले. या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bajar Samiti) सरला मुळे या नवनिर्वाचित महिला सभापतींच्या नावाने महिलाराज आले आहे. (Tajya Batmya)

Beed Bajar Samiti
Dhule News: फोटो काढून व्‍हायरल करायची धमकी; महिलेवर शेतमालकाचा अत्याचार

दरम्यान आतापर्यंत बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, माजलगाव, केज, पाटोदा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. तर उर्वरित परळी, अंबाजोगाई, गेवराई, वडवणी या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी पुढील तीन दिवसात होणार आहेत.

Beed Bajar Samiti
Jalgaon News: जेवण करून सर्वजण झोपले; पहाटे उठले असता कुटूंबाला बसला धक्‍का

३५ वर्षानंतर सत्‍तांतर

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये या एक आगळीवेगळी निवडणुक झाली आहे. कारण या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली ३५ वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सत्ता होती. या सत्तेला सुरूंग लावत पुतण्या संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, उध्दव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ३५ वर्षाची सत्ता मोडत काढून सर्वपक्षीय कृषी उत्पन्न बाजार समिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com