Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : अटक न करण्यासाठी घेतली लाच; पोलिस नाईक एसीबीच्या ताब्यात

Dhule News : संबंधिताने त्याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती कळविली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : प्रतिबंधक कारवाई करुन अटक न करण्यासाठी दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना (Shirpur) शिरपूर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Dhule ACB) पथकाने बुधवारी (ता.22) दुपारी रंगेहाथ पकडले. (Live Marathi News)

शिरपूर शहरातील एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्यावरुन प्रतिबंधक कारवाई करून अटक न करण्यासाठी टाकणे याने संबंधिताकडे दीड हजार रुपयांची (Bribe) मागणी केली. हे देण्याचे निश्चित झाले होते. मात्र संबंधिताने त्याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती कळविली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेणार! रेपो रेटमध्ये कपात करणार? होम लोनवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT