Shirpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime : जन्मदात्याकडून चिमुरडीची हत्या; पोलिसांनी बापाला घेतले ताब्यात

Shirpur News : दारूच्या नशेत त्याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घाव घालून तिचा खून केला. पहाटे मृतदेह घरामागे मोकळ्या जागेत पुरल्याचा संशय पोलिसांना आहे

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : तीन वर्षीय चिमुरडीचा खून करून घराजवळ मृतदेह पुरल्याच्या संशयावरून बापाला पोलिसांनी अटक केली. हि खडबडजानक घटना ८ जूनला उघडकीस आली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून संशयित बापाला अटक केली आहे.

शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथे ही घटना घडली असून या घटनेत पूजा अनिल पावरा या बालिकेची हत्या तिच्याच वडिलांनी केली. अनिल गुलाब पावरा खुनातील प्रमुख संशयित आहे. दरम्यान ६ जूनला रात्री दारूच्या नशेत त्याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घाव घालून तिचा खून केला. पहाटे मृतदेह घरामागे मोकळ्या जागेत पुरल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस पाटील पंकज पावरा यांनी माहिती देताच प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृत पूजाचा मृतदेह उकरून काढण्यात आला.

नातेवाईकांना संशय आल्याने समोर आली घटना

पूजा ही अनिल पावराच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. पूजाची आई आणि अनिलचा घटस्फोट झाल्याने ती निघून गेली आहे. त्यानंतर अनिलने दुसरे लग्न केले. मात्र दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. अनिलच्या शेजारी त्याचे नातलग राहतात. त्यांच्या घरी पूजाचे येणे- जाणे होते. मात्र दोन दिवसांपासून ती दिसत नसल्यामुळे त्यांनी अनिलकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिस पाटील पंकज पावरा यांना ही बाब सांगितली. पावरा व अन्य नातलगांनी विचारणा केल्यावर अनिलने पूजाचा खून करून मृतदेह पुरल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT