Shirpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Accident : मामाला भेटायला जाताना काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Shirpur News : सांगवी महामार्गावर शिरपूरकडून येणाऱ्‍या भरधाव ट्रकने आत्तरसिंगच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेजण फेकले गेले. धडकेत आत्तरसिंगच्या डोक्याला गंभीर मार लागला

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी परिसरात पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेतील मृत तरुण हा आपल्या मामाला भेटण्यासाठी जात असताना अपघात झाला. या प्रकरणी वाहन चालकावर शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील गुजर खुर्दे येथील आत्तरसिंग शांत्या पावरा (वय २५) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. आत्तरसिंग पावरा हा रविवारी सकाळी मामेभाऊ प्रदीप पावरा (वय १३) याच्यासोबत दुचाकीने मध्य प्रदेशातील मोजली (ता. सेंधवा) येथे मामाच्या गावी जात होता. याच दरम्यान सांगवी महामार्गावर शिरपूरकडून येणाऱ्‍या भरधाव ट्रकने आत्तरसिंगच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेजण फेकले गेले. 

ट्रकने दिलेल्या धडकेत आत्तरसिंगच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला प्रदीप हा रस्त्याच्या कडेला पडल्याने जखमी झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील वाहन चालक, महामार्ग पोलिस व तालुका पोलिसांसह ग्रामस्थांनी महामार्ग रुग्णवाहिकेने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

ट्रक सोडून चालक फरार 

सदर अपघात झाल्यानंतर महामार्गावर वर्दळ थांबली होती. तर गर्दी जमल्याचे पाहून ट्रक चालक अपघात स्थळावर न थांबता ट्रक सोडून फरार झाला आहे. दरम्यान शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चालकाचा शोध सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT