Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : रस्त्याने चालणाऱ्या महिलेला दुचाकीची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंद येथे भरधाव दुचाकीने पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना

भूषण अहिरे

धुळे : सध्या राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. याच दरम्यान पादचारी महिलेला एका दुचाकी धारकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना शिरपूर तालुक्यातील करवंद नाका परिसरात घडली आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) तालुक्यातील करवंद येथे भरधाव दुचाकीने पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली होती, या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया वरती व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला आपल्या पतीसह रस्त्याने पायी चालत असताना मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने महिलेला जोरदार (Accident) धडक दिली. यात महिला काही वेळ हवेमध्ये उडाल्याचे देखील दिसून येत आहे.  

सदरच्या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून महिलेला तिच्या पतीने तात्काळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पुढील कारवाई शिरपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT