Dhule Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: शेतजमीन वाटणीच्या कामासंदर्भात मागितली लाच; सात हजार स्वीकारताना मंडळ अधिकारी ताब्यात

मंडळ अधिकारी विजय बाबा यांनी तक्रारदाराकडे १८ हजारांच्या लाचेची मागणी केली होती

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : कौटुंबिक शेतजमीन वाटणीच्या कामासंदर्भात तक्रारदाराकडून सात हजारांची लाच स्वीकारताना (Sakri) निजामपूर येथील मंडळ अधिकारी विजय वामन बावा यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले. ही लाच (Bribe) भामेर (ता. साक्री) येथील तक्रारदाराच्या राहत्या घरीच स्वीकारताना बुधवारी (२१ जून) अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

भामेर (ता. साक्री) येथील गट नंबर ४३ व ४४ या शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीच्या कामासाठी निजामपूर मंडळ अधिकारी विजय बाबा यांनी तक्रारदाराकडे १८ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती १५ हजार रुपये सांगून त्यापैकी आधी आठ हजार रुपये घेतले होते. उर्वरित सात हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी करून भामेर येथील तक्रारदाराच्या राहत्या घरी स्वीकारताना मंडळ अधिकारी विजय बाबा यास पथकाने पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळ्याचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण यांच्यासह पथकातील राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परीक्षेत्र पोलिस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार आदींचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT