धुळे : एकेकाळी धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपने हा जिल्हा काबीज केला. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने धुळ्यात अनपेक्षितआपले पाय रोवले. त्यामुळे यंदाही मविआ आणि महायुतीसोबत एमआयएमही प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. यंदा धुळ्यात पंचरंगी लढत होणार आहे.
2019 मधील मतांचं समीकरण?
फारुख शाह - आमदार,एमआयएम- 46 हजार 679 मतं
राजवर्धन कदमबांडे,अपक्ष - 43 हजार 372 मतं
अनिल गोटे,अपक्ष - 42 हजार 432 मतं
फारुख शाह 3 हजार 307 मतांनी विजयी
धुळ्यात इच्छुकांची भाऊगर्दी?
अनिल गोटे, ठाकरे गट,
अनुप अग्रवाल,भाजप
फारुक शहा,एमआयएम,
इरशाद जहागीरदार,सपा
जितेंद्र शिरसाट,वंचित
धुळ्यात मतदारसंघात जातीय समीकरणांची बेरीज विजयाचा मार्ग ठरवते, असा इतिहास आहे. मात्र धुळ्यातील जातीय समीकरणं कशी आहेत? पाहूयात...
धुळ्याचं जातीय गणित
एकूण मतदार 3 लाख 64 हजार 265
मुस्लीम मतदार- 65 हजार
हिंदू मतदार- 2 लाख 99 हजार 265
जरी हिंदू मतदारांची संख्या अधिक असली तरी अनेक हिंदू उमेदवारांमुळे हिंदू मतांचं विभाजन झालं तर एकमेव मुस्लीम उमेदवारामुळे मतांचं ध्रुवीकरण एमआयएमच्या पथ्यावर पडलं.
2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपने अनुप अग्रवाल यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. एमआयएम पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार फारुख शाह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एमआयएमला पराभूत करून आपल्या पक्षाचा झेंडा धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर फडकविण्याचे आव्हान भाजपसह ठाकरे गटासमोर उभे आहे. आता या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.