Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : चिमुकल्याचा धरणात बुडून मृत्यू; शेळ्या चारण्यासाठी तिघे मित्र गेले होते धरणाच्या काठी

Dhule News : घटनेची माहिती वडील विनोद देसाई यांना मिळताच त्यांच्यासह गावातील काहीजण धरणावर आले. पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली होती.

Rajesh Sonwane

पिंपळनेर (धुळे) : धरणात नावेवर बसून जात असताना, नाव अचानक डगमगू लागली. यानंतर तिघांनी पाण्यात उडी मारली. यातील दोघांना पोहता येत असल्याने ते बाहेर निघाले. मात्र आठ वर्षीय चिमुकल्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जामखेली (ता. साक्री) येथील धरणात घडली. 

धंगाई (ता. साक्री) येथीलतीन मुले शेळ्या चारण्यासाठी आठवर्षीय बालक बालम विनोद देसाई व त्याचे मित्र दीपक साई व करण असे तिघे शेळ्या चारण्यासाठी धरणाकडे गेले होते. दरम्यान दुपारी तिघेजण नावेवर बसून धरणात गेले. धरणात नाव डगमगू लागल्याने तिघांनी घाबरून पाण्यात उडी मारली. यातील दीपक व करण यांना पोहता येत असल्याने ते काठावर आले. परंतु बालम पाण्यातच बुडाला. 

सदर घटनेची माहिती वडील विनोद देसाई यांना मिळताच त्यांच्यासह गावातील काहीजण धरणावर आले. पोलिसांना (Police) देखील या घटनेची माहिती देण्यात आली होती. गावकऱ्यांनी व पोलिसांनी बालम यास पाण्यात शोधले असता बालम आढळून आला. त्याला ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल केले असता, डॉ. मावची यांनी तपासून मृत (death) घोषित केले. विनोद देसाई यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात बालम देसाई याची अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT