Dhule: अनोखा उपक्रम! इथे होते एक रुपयात लग्न, सोबत गादी, पलंग, फ्रीज, कुलरचा आहेरही... Saam Tv
महाराष्ट्र

Dhule: अनोखा उपक्रम! इथे होते एक रुपयात लग्न, सोबत गादी, पलंग, फ्रीज, कुलरचा आहेरही...

दोंडाईचा येथील गरीब नवाज वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने माजी उपमहापौर हाजी नबू पिंजारी यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धुळे : लाखो रुपये खर्च करून देखील लग्न (married) होतांना आपण रोजच बघत असतो. मात्र, दोंडाईचा (Dondai) येथील गरीब नवाज वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने माजी उपमहापौर (Deputy Mayor) हाजी नबू पिंजारी यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. मागील १५ वर्षांपासून वधू- वर वडिलांकडून केवळ १ रुपया घेऊन लग्नाचे (married) विधी पार पाडत आहेत. या विवाह सोहळ्यात संसारोपयोगी साहित्य देखील नवविवाहित जोडप्यांना दिले जात आहे. अजमेर (Ajmer) येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूसनिमित्त धुळे (Dhule) जिल्ह्यात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Dhule one rupee give and get married)

हे देखील पहा-

दोंडाईचा येथील गौसिया नगरामध्ये या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, सरकारसाहेब रावल, अमित पाटील, राम रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, प्रवीण महाजन, जितेंद्र गिरासे, वसीम पिंजारी, इस्माईल पिंजारी, दानिश पिंजारी, नाझीम पिंजारी, अहमद पिंजारी, अक्रमभाई अनरे आदी जणांची येथे उपस्थित होते. यावेळी सुफीस तडवी, सलीम मेमन, मुख्तार पठाण, शकील खाटीक, मुख्तार खाटीक, आयुब खाटीक, रफिक शाह आदी मान्यवर उपस्थित होते. आणि नवदाम्पत्याला शुभेच्छा दिले आहेत.

या सोहळ्यामध्ये १२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. संस्थेने वधू- वरांना आशीर्वाद देण्याकरिता आलेल्या प्रत्येकाला अल्पोपाहार आणि भोजन दिले आहे. गरीब नवाज वेलफेअरचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर हाजी नबू हाजी बशीर पिंजारी यांनी प्रत्येक जोडप्याला गादी, बेड, फ्रिज, कपाट, कुलर, गॅस कनेक्शन, भांडी इत्यादी गोष्टीची पूर्तता दिली आहे. प्रतिक्रिया देत असताना हाजी नबूशेठ पिंजारी म्हणाले की, अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या धार्मिक उत्सवानिमित्त आम्ही दोंडाई येथे गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत.

समाजात गरीब कुटुंबातील (family) वधू- वरांचे लग्न केवळ १ रुपयात लावून देत आहेत. धार्मिक सणांबरोबरच हे सामाजिक कार्य कल्याणकारी संस्थेतर्फे केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम देखील राबवले जात असतात. या विवाह सोहळ्याकरिता अगोदर जनजागृती केली जाते. पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये असाच विवाह सोहळा होणार असल्याने गरजू वधू- वरांनी या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT