Dhule Tapi River Saam tv
महाराष्ट्र

VIDEO: तरुणानं पुलावरून नदीत मारली उडी, वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओ काढत राहिले; तरुणानं गमावला जीव

तरुणानं पुलावरून नदीत मारली उडी, वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओ काढत राहिले; तरुणानं गमावला जीव

Rajesh Sonwane

धुळे : तापी नदीपात्रामध्ये एका तरुणाने आत्महत्या करण्याच्या हेतूने पुलावरून उडी घेतली. परंतु त्याला वाचवण्यापेक्षा व्हिडिओ काढण्यातच बघ्यांनी धन्यता मानली. मात्र या सर्व प्रकारात नदीत उडी मारलेल्‍या तरुणाचा (Death) मृत्‍यू झाला आहे. (Letest Marathi News)

माणसातली माणुसकी हरपली आहे का असाच काहीसा प्रश्न या आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या घटनेवरून उपस्थित होत आहे. (Shirpur) शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील (Tapi River) तापी नदीपुलावरुन 24 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुलावरून जाणाऱ्या प्रवासीने तरुणाचा बुडतांनाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. यावेळी संबंधित प्रवाशाने नदीपात्रात उडी मारलेल्या (Dhule News) तरुणास बाहेर येण्यासंदर्भात आवाहन देखील केले. परंतु पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाने नागरिकांतर्फे केले जात असलेल्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले. काही काळ हातपाय हलवत पाण्यावर तरंगलेल्या तरुणाने काही वेळाने हातपाय हलवणे बंद केले व बघता बघता हा तरुण काही क्षणात पाण्यात बुडाला.

नदीपात्रात शोध सुरु

सदर मोटारसायकलवरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी टेंभे येथील ग्रामस्थांसह नागरिकांनी धाव घेतली. सुरेंद्र राजपूत असे संबंधित तरुणाचे नाव असून त्याचा तापी नदीपात्रात शोध सुरु आहे. सुरेंद्र राजपूत हा कृषी क्षेत्रातील कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता. संबंधित तरुणाने टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT