Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून नशामुक्त महाराष्ट्र करा; शेकडो पत्र पाठवून महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Dhule News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जात आहेत. रक्षाबंधनानिमित्ताने हि भेट म्हटले जात आहे.

भूषण अहिरे

धुळे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने धुळे तालुक्यातील फागणे येथून शेकडो महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. महिलांनी या पत्रांच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून नशा मुक्त महाराष्ट्र करण्याची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जात आहेत. रक्षाबंधनानिमित्ताने हि भेट म्हटले जात आहे. दरम्यान याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करावी; अशी देखील मागणी यावेळी या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. (Dhule) फागणे या गावातील शेकडो महिलांनी ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. 

बहुतांश बहिणींचे संसार दारूमुळे उध्वस्त होत असल्यामुळे फागणे गावातील दारूमुळे संसार उध्वस्त झालेल्या महिलांनी एकत्रित येत (Rakshabandhan) रक्षाबंधनानिमित्त "मुख्यमंत्री लाडक्या भावाकडे हट्ट पाहिजे नशा मुक्त महाराष्ट्र" अशा प्रकारच्या घोषणा देत या सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामूहिकरित्या पत्र लिहून नशा मुक्त महाराष्ट्र करण्याची मागणी केली आहे, या लाडक्या बहिणींची आर्त हाक मुख्यमंत्री भाऊ रक्षाबंधनाच्या निमित्ताने नक्कीच ऐकतील व नशा मुक्त महाराष्ट्र करतील; अशी आशा या महिलांनी बाळगून हे शेकडो पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Maharashtra News Live Update: खामगावात FDAची मोठी कारवाई; साडेतीन कोटींचे संशयास्पद सोयाबीन तेल जप्त

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

SCROLL FOR NEXT