Dhule rain 
महाराष्ट्र

ऑरेंज अलर्ट.. रात्रीपासून धुळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात

ऑरेंज अलर्ट.. रात्रीपासून धुळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात

भूषण अहिरे

धुळे : हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्‍यानुसार रात्रीपासून धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. (dhule-news-uttar-maharashtra-orange-alert-and-dhule-late-night-heavy-rain-droped)

खानदेशात मागील दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारलेली होती. दीड महिन्‍याच्‍या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री त्याचबरोबर शिरपूर तालुक्यांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. धुळे शहरासह तालुक्यात देखील रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून देखील ढगाळ वातावरणासह रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे.

पावसामुळे आशा पल्‍लवीत

ऑगस्ट महिना निम्म्याहून अधिक उलटला असला तरी देखील धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे प्रकल्पांमधील पाणी पातळी खालावली आहे. रात्रीपासून जिल्ह्यामधील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्यामुळे धुळेकरांना या पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT