Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : लूट करणारे दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : लूट करणारे दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर व परिसरात मागील काही दिवसात चोरी व लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. अशा जबरी चोरी करून लूट करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांच्या (Dhule) धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून (Police) मुद्देमाल देखील ताब्यात घेतला आहे. (Maharashtra News)

धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एका हॉटेल कामगाराची तीन जणांनी रस्त्यात जबरी लूट केली होती. त्यांच्याकडून दुचाकी त्याचबरोबर पाचशे रुपये रोकड व मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. या घटनेच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता या गुन्ह्यातील दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन जण असल्याचे उघडकीस आले आहे. 

ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून लुटलेला ऐवज देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर या दोघा चोरट्यांचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा देखील शोध धुळे शहर पोलिसातर्फे सुरू आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कारवाई संदर्भातील माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT