Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : पाण्याच्या बाटल्याआडून दारूची वाहतूक; धुळ्यात पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

Dhule News : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत अवैधपणे दारूची वाहतूक केली जाणार असल्याबाबत माहिती मिळाली होती

भूषण अहिरे

धुळे : अनेकदा कारवाई झाल्यानंतर देखील अवैधपणे दारूची वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनावर कारवाई करत एका जणाला ताब्यात घेतले आहे.  

धुळे (Dhule) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत अवैधपणे दारूची वाहतूक केली जाणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Dhule LCB) चाळीसगाव रोड चौफुली परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या वाहनात पाण्याच्या बाटल्यांच्या आड मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी एका जणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
सदरच्या कारवाईमध्ये पोलिसांनी वाहनासह दीडशे दारूने भरलेले बॉक्स हस्तगत केले आहेत. त्याची बाजारामध्ये पाच लाख २५ हजार रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासह इतर मुद्देमालासह एकंदरीत ७ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्दामाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT