Traffice police 
महाराष्ट्र

धुळे शहरात ठिकठिकाणी लावणार माहिती फलक

धुळे शहरात ठिकठिकाणी लावणार माहिती फलक

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात वाढत्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. शिवाय, रस्‍त्‍यांवर माहिती फलक नसल्‍याने गोंधळ उडत असतो. वाहनधारकांमध्ये असलेल्या माहितीचा अभावामुळे शहरात ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात येणार आहेत. (dhule-news-traffice-issue-75-spot-desplay-banner-in-city-road)

धुळे शहरातील नागरीकांना वाहतुक नियमांबाबत जनजागृती व्हावी; तसेच जे वाहन धारक आपली वाहने रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी पार्किंग करतात. त्या वाहनचालकांसाठी योग्य ते माहिती दर्शक फलक धुळे शहरातील ए.यु.बँक यांच्या सौजन्याने व धुळे महापालिका व शहर वाहतुक शाखा यांच्या माध्यमातुन लावले जाणार आहेत.

७५ ठिकाणी लागणार फलक

धुळे शहरात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते संतोषी माता चौक परिसरात अनावरण करण्यात आले आहे. हे माहितीदर्शक फलक धुळे शहरात एकूण ७५ ठिकाणी लावण्यात येत आहे. आज शुक्रवार रोजी याला सुरुवात करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्‍यास कारवाई

धुळे शहरातील जे वाहन चालक वाहतुक नियमांचे उल्लंघन करतील तसेच बसविण्यात आलेले माहिती फलकांच्या नियमाप्रमाणे पालन न केल्यास त्यांच्यावर मोटर व्हिईकल अॅक्टप्रमाणे कायदेशीर कारवाई शहर वाहतुक शाखेमार्फत करण्यात येईल अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन सपोनि संगीता राऊत, पोउनि रामदास जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT