Bribe Case
Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : ग्रामसेवकाने घेतली ५० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : गावात पेव्हर ब्लॉक, शाळेसाठी संरक्षण भिंत, मुला-मुलींसाठी सुलभ शौचालयाच्या (Dhule) कामाला मंजुरी मिळविण्यासाठी तक्रारदाराकडून ग्रामसेवकाने ५० हजारांची लाच घातली. सदरची रक्कम स्वीकारताना म्हसदी येथील (Gram Sevak) ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास बोरसे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) तालुक्यातील म्हसदी येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीने त्यांच्या वॉर्डात काम मंजूर होण्यासाठी सरपंच तसेच ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेऊन पत्नी सदस्य असलेल्या वॉर्डातील ऊर्दू शाळेत संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला-मुलींसाठी सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळावी, यासाठी अर्जवजा विनंती केली होती. यावेळी ग्रामसेवक बोरसे याने कामाचे अंदाजपत्रकानुसार २० टक्केप्रमाणे दोन लाख ४० हजार रुपयांनी काम घेणाऱ्या ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल, असे (Bribe) तक्रारदारांना सांगितले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तक्रारदारांना ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणीप्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या अनुषंगाने ४ मार्चला (Dhule ACB) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. ७ मार्चला तक्रारीच्या पडताळणीदरम्यान ग्रामसेवक बोरसे याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती दोन लाखांची मागणी करून या रकमेपैकी ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २५ एप्रिलला ग्रामसेवक बोरसे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar Benefits : सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जाणून घ्या

Washim Railway : शकुंतला रेल्वेचा ट्रॅकच गेला चोरीला, घटनेने खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

SCROLL FOR NEXT