Death
Death Saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक..मजूरीला गेलेल्‍या आईला दिसली फक्‍त मुलाची राख; झोपडीला अचानक आग

भूषण अहिरे

धुळे : हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना शिंदखेडा तालुक्यात पढावद शिवारात घडली आहे. झोपडीमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याला लहान मुलीसोबत एकट सोडून मजुरी करण्यासाठी जाणे आईला चांगलच महागात पडले आहे. आई मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेली असताना झोपडीला अचानक आग (Fire) लागली व या झोपडीमध्ये निरागसपणे झोपलेला दोन वर्षांचा चिमुकला आगीच्या भस्मस्थानी येऊन होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (dhule news three year old boy also died due to burning of hut)

पोटाची खळगी (Dhule News) भरण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाला व त्यापेक्षा मोठ्या मुलीला घरी एकट टाकून शेतात मजुरी करण्यासाठी आई गेली. या आईला अचानक समजले, की त्यांच्या झोपडीला आग लागली त्या झोपडीमध्ये तीन वर्षांचा चिमुकला झोपलेला होता. झोपडीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास येताच झोपडी बाहेर खेळत असलेल्या मुलीने घाबरून गावाच्या दिशेने धाव घेतली.

तोपर्यंत उशीर झाला

परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी पेटत्या झोपडीकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन विभागाच्या पथकाला या संदर्भातील माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच (Fire Brigade) अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला व आग विझवण्यात आली. परंतु तो पर्यंत झोपडीमध्ये निरागस झोपलेला तीन वर्षांचा चिमुकला मात्र आगीच्या भस्मस्तानी घेऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

वर्षभरापुर्वीच पतीचा मृत्‍यू

वर्षभरापूर्वीच या चिमुकल्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या दोन चिमुकल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते. अशा परिस्थितीमध्ये या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर आणखीनच दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या पीडित कुटुंबाला शासनातर्फे मदत मिळावी; अशी मागणी परिसरातील लोकप्रतिनिधींतर्फे करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT