Dhule News  Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: फोटो काढून व्‍हायरल करायची धमकी; महिलेवर शेतमालकाचा अत्याचार

फोटो काढून व्‍हायरल करायची धमकी; महिलेवर शेतमालकाचा अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शेतातील मजूर तरुणीचे अंघोळ करतानाचे चोरून काढलेले छायाचित्र तिला दाखवून ते व्हायरल (Dhule News) करण्याची धमकी देत शेतमालकाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. याबाबत जाब विचारणाऱ्या तिच्या आई- वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेतमालकावर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)

राणीपुरा (ता. शिंदखेडा) येथील पीडित १९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडितेचे आई- वडील हे आनंदा दगा पाटील (रा. चिंचखेडा) याच्या शेतात मजुरी करीत होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान संशयित आनंदा पाटील याने पीडितेचे (Crime) अंघोळ करतानाचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये चोरुन काढले. नंतर ते तिला दाखवून फोटो तिच्या सासरी दाखविण्याची भीती घातली.

आई– वडीलांनाही दिली धमकी

तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब पीडितेच्या आई- वडिलांना लक्षात आल्यानंतर ते जाब विचारण्यास गेले. त्यावेळी आनंदा पाटील याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. मोबाईलमधील फोटो तिच्या सासरच्यांना दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यानुसार संशयित आनंदा पाटील याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT