Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: तृतीयपंथीयांनी बच्चू कडू यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध

तृतीयपंथीयांनी बच्चू कडू यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध

भूषण अहिरे

धुळे : बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादा दरम्यान बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राणा यांच्यावर हिजडा या शब्दाचा वापर केला. यामुळे धुळ्यातील (Dhule News) तृतीयपंथी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. या विरोधात तृतीय पंथीयांनी बच्‍चू कडू यांच्‍या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. (Breaking Marathi News)

बच्चू कडू यांनी 23 ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी बोलताना राणा (Ravi Rana) यांच्या बद्दल हिजडा या शब्दाचा शब्दप्रयोग केला. यामुळे तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप या सर्व तृतीय पंथीयांनी केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने जर त्यांना मंत्रिपदावर घेतले. तर आम्ही राज्य सरकारचा देखील मुख्यमंत्री कार्यालयात बाहेर टाळी ठोकून आंदोलन करू असा इशारा थेट मुख्यमंत्र्यांना या सर्व तृतीय पंथीयांनी दिला आहे.

गुन्‍हा दाखल करण्याची मागणी

धुळ्यातील तृतीय पंथीयांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बच्चू कडू यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन केले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या सर्व संतप्त तृतीयपंथीयांनी बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा नोंद करण्याची मागणी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT